राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बिजू जनता दलाला आपल्या आघाडीत आणण्यात यशस्वी ठरलेल्या तिसर्या आघाडीची नजर आता चौथ्या आघाडीवर आहे. कॉंग्रेस आघाडीचे हे घटक आपल्याबरोबर येतील असा तिसर्या आघाडीला विश्वास आहे.
माकपचे पॉलीट ब्युरोचे सदस्य सीताराम येचुरी यांनी हा दावा केला. तिसरी आघाडी सर्वांत मोठी आघाडी म्हणून अस्तित्वात येईल. यात सध्या डावे पक्ष, तेलगु देसम, अण्णा द्रविड मुन्नैत्र कळघम, जनता दल सेक्युलर हे आहेतच. पण यात मायावतींचा बहूजन समाज पक्ष किंवा चौथ्या आघाडीतील समाजवादी पक्ष व राष्ट्रीय जनता दलही येऊ शकतात. निवडणूक आल्यानंतरच हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.