लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसर्या टप्प्यासाठीसाठी राज्यातील दहा मतदार संघासह देशातील १०७ मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. त्यात कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांच्यासह १५६७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल.
तिसर्या टप्प्यातील महत्त्वाच्या उमेदवारांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, सेक्युलर जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा, केंद्रिय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल आणि ज्योतिरादित्य शिंदे, विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा समावेश आहे.
तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह, गुजरातमधील सर्व २६, मध्य प्रदेशातील १६, उत्तर प्रदेशातील १५, पश्चिम बंगालमधील १४, बिहार, कर्नाटकमधील १० आणि जम्मू-काश्मीर, सिक्कीम, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव येथील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होईल.
महाराष्ट्रातील दहा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांतील मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणीसाठी १६ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.