लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात देशभरातील १०७ मतदारसंघांत प्रारंभिक आकडेवारीनुसार सरासरी पन्नास टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नऊ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील १०७ मतदारसंघात १४ कोटी ४० लाख दोन हजार २६५ मतदारांपैकी पन्नास टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे आता १०१ महिलांसह १५६७ उमेदवारांचे भवितव्य आता मशीनबंद झाले आहे.
सर्वांत जास्त म्हणजे ६५ टक्के मतदान पश्चिम बंगाल व सिक्कीममध्ये तर सर्वांत कमी २५ टक्के जम्मू- काश्मीरमध्ये झाले. दादरा नगर हवेली आणि दमण व दीवमध्ये प्रत्येकी ६० टक्के, कर्नाटकमध्ये ५७, गुजरातमध्ये ५०, बिहारमध्ये ४८, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात ४५ टक्के मतदान झाले.
या तिसर्या टप्प्यामुळे लोकसभेच्या ५४३ पैकी ३७२ मतदारसंघांसाठी मतदान पूर्ण झाले आहे.
मतदानाची राज्यवार टक्केवारी अशीः
राष्ट्रीय .. 50 पश्चिम बंगाल .. 65 सिक्किम .. 65 दादरा नगर हवेली .. 60 दमन दीव .. 60 कर्नाटक .. 57 गुजरात .. 50 बिहार .. 48 मध्य प्रदेश .. 45 उत्तर प्रदेश .. 45 महाराष्ट्र .. 45 जम्मू कश्मीर .. 25