लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा येत्या तीस एप्रिलला पार पडत असून यादिवशी कॉग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह १५६७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. नऊ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात या दिवशी मतदान होईल.
गुजरातमधील २६, मध्य प्रदेशातील १६, उत्तर प्रदेशातील १५, पश्चिम बंगालच्या १४, बिहार व कर्नाटकच्या ११, महाराष्ट्रातील १० तसेच जम्मू काश्मीर, सिक्कीम, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल.
सोनिया, अडवानींव्यतिरिक्त, सेक्युलर जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, मुंबई उत्तर मध्यमधून प्रिया दत्त, मध्य मुंबईतून राम नाईक यांचे भवितव्य या दिवशी ठरेल.
सिक्कीम विधानसभेच्या ३२ जागांसाठीही याच दिवशी मतदान होईल.