डाव्यांनाही आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत. तिसर्या आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास एखादा कम्युनिस्ट पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे डाव्यांमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे.
बिगर भाजप व बिगर कॉंग्रेसी सरकार स्थापन झाल्यास पहिल्यांदा तो अणू करार रद्द केला जाईल, असे सुतोवाचही डाव्यांन केले आहे. याच मुद्यावरून कॉंग्रेस व डाव्यांमधील मतभेदाची दरी रूंदावत जाऊन डाव्यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढला होता.
कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही. पण आम्ही सध्या त्या दृष्टिने विचार करत नाही. वेळ आल्यानंतर आम्ही त्या दृष्टिने विचार करू. पंतप्रधानपदाच्या यादीत आम्ही स्वतःला या वेळेस जोडू इच्छित नाही, असे भाकपाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांनी सांगितले.
पंतप्रधानपदासाठी डाव्यांनी कोणताही उमेदवार दिलेला नाही. कारण बिगर कॉंग्रेसी व बिगर भाजपचे सरकार स्थापन करणे याला आमचे प्राधान्य राहिल, असेही बर्धन यांनी स्पष्ट केले.