Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान पहिलवान असण्याची गरज नाही- मुखर्जी

पंतप्रधान पहिलवान असण्याची गरज नाही- मुखर्जी

वार्ता

पंतप्रधान होण्यासाठी पहिलवान असण्याची गरज नाही. पंतप्रधान ही व्यक्ती विचारवंत राजकीय नेता हवी आणि जगाला ती प्रभावीत करू शकली पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याची टीका भाजप नेते लालकृष्ण अडवानी करत आहेत. त्याला उत्तर देताना श्री. मुखर्जी बोलत होते.

पंतप्रधान पहिलवानासारखा दणकट शरीरयष्टीचा किंवा बडबड्या असण्याची गरज नाही., असे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कुशल नेतृत्वामुळेच मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान झुकले आणि या हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक सहभागी असल्याचे मान्य केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Share this Story:

Follow Webdunia marathi