हल्ली राजकारणात पंतप्रधान जाहीर करण्याची फॅशनच आली आहे. कोणताही पक्ष उठतो नि पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहिर करतो, अशा शब्दांत कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान जाहिर करण्याच्या ट्रेंडची खिल्ली उडवली.
हिस्सार येथे प्रचार सभेत त्या बोलत होत्या. कॉंग्रेस सुरवातीपासूनच गरीब व मागासांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आम्ही दिलेली वचने पूर्णही केली आहेत, असे त्यांनी सांगितले. बाकीचे पक्ष खोटी वचने देतात आणि धर्म व जातीच्या नावावर मते मागतात, अशी टीकाही त्यांनी केली.