पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आसामची राजधानी दिसपूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. मात्र, या मतदान केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय होती.
या शाळेच्या मुख्याध्यापिका बिलीबाला देवी यांच्या मते शाळेत मुलभूत सुविधांची कमरतरता आहे. राज्याच्या धिम्या विकासाचे ही शाळा हे प्रतीक आहे. बाहेरून पाहिल्यानंतरच शाळेच्या दुरूस्तीची गरज असल्याचे कळते.
शाळेची अवस्था फारच वाईट आहे. म्हणूनच बिलीबाला देवींना पंतप्रधानांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडायची होती. पण त्यांना ती संधीच मिळाली नाही. पण तरीही पंतप्रधानांनी आमच्या शाळेच मतदान केले ही त्यांच्या दृष्टिने अभिमानाची बाब आहे. अर्थात, पंतप्रधान येणार म्हणून बिलीबालादेवींना आपले मतदान करायला गावी जाताच आले नाही.