शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला आता प्रजा राज्यम पक्षाचे (पीआरपी) प्रमुख व अभिनेता चिरंजीवी यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. पवारांच्या नावावर आम्ही नक्कीच विचार करू असे त्याने सांगितले.
पंतप्रधानपदासाठी पवार योग्य उमेदवार असून सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असे तो म्हणाला.
चौथ्या आघाडीला पुरेशी मते मिळाल्यास पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत प्रजाराज्यमच्या राजकीय विषयांच्या संदर्भातील समितीने दिले होते.
दरम्यान, पवारांच्या पंतप्रधानपदाला समाजवादी पक्ष, जयललिलांचा अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलही पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहे.