गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघात आज सात पाकिस्तानी नागरिकांना मतदार यादीत नाव असूनही मतदानापासून रोखण्यात आले.
कुसुम नुरूद्दीन.राशिदाबानू कादरी.देवानंद वेलजी.मेघना देवानंद.गीता नारायण.हंसा राजेश अमरशी हिंगला अशी त्यांची नावे आहेत. दीर्घ कालावधीसाठी असलेल्या व्हिसावर ते येथे रहात आहेत. त्यांना जिल्हाधिकारी एच. एस. पटेल यांनी मतदान करण्यापासून रोखले. व्हिसावर भारतात रहात असूनही त्यांची नावे मतदार यादीत कशी आली याची आता चौकशी केली जाणार आहे.