बाबरी मशिदीच्या पतनाला भाजपला थेट जबाबदार धरून ही राष्ट्रीय शरमेची बाब असलेल्या घटनेला रोखण्यात कॉंग्रेसही अपयशी ठरल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलीट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी यांनी केली आहे.
बाबरी मशिदीच्या घटनेत भाजपने खुन्याची भूमिका केली, पण कॉंग्रेस कोतवालाची भूमिका समर्थपणे पार पाडण्यात अपयशी ठरले, असे ते म्हणाले. ही मशिद पाडण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज होती. पण या घटनेने देशाला मान खाली घालायला लावली त्यांच्याचकडे ती सुपूर्द करण्यातच कॉंग्रेसने धन्यता मानली असा आरोप त्यांनी केला.