बिहारच्या 146 तर झारखंडच्या 58 मतदान केंद्रांवर पुनर्मतदान करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्या दरम्यान या भागात काही मतदान केंद्रांवर कायदा व्यवस्था अडचणीत आली होती. तर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.
उप निवडणूक आयुक्त आर. बालाकृष्णन यांनी पत्रकारांना संवाददाताओं यांनी याबाबत माहिती दिली की बिहारच्या नऊ मतदान केंद्रांवर मतदान झाले नव्हते. बिहारमध्ये पुनर्मतदानाची तारीख अद्याप निश्चित नाही तर झारखंडच्या 58 मतदान केंद्रांवर 28 एप्रिल रोजी पुनर्मतदान होईल.