बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील मोंगरा मतदान केंद्रावर आज सकाळी दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन पोलिस गंभीर जखमी झालेत. यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करत या उमेदवारांच्या समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
पोलिस अधीक्षक ए के यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान केंद्रा बाहेर उभे राहण्यावरून हा वाद सुरू झाला, यानंतर दोनही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करत दगडफेक सुरू केली.
पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने यात तीन पोलिस जखमी झालेत.