भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर गांधी कुटूंबासह पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार टीका केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीनेही कॉंग्रेसवर पलटवार करत पंतप्रधानपदाचे खरे उमेदवार राहुल गांधीच असल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेस जनतेची फसवणुक करत असून, मनमोहन सिंग यांच्या नावाखाली मतं मागितली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे.
मनमोहन सिंग हे कमकुवतच असल्याचे सांगत भाजप प्रवक्ते रवि शंकर प्रसाद यांनी कॉंग्रेस आणि गांधी कुटूंबावर जोरदार प्रहार केला आहे.
प्रियंका गांधी, आणि स्वत: मनमोहन यांनी राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे संकेत दिले असून, मनमोहन यांच्या नावाचा कॉंग्रेस वापर करत असल्याचे प्रसाद म्हणाले.