भारतीय जनता पक्ष अस्पृश्य नाही आणि त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला तर आपला पक्ष तो स्वीकारायला तयार आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी.ए.संगामा यांनी केले.
श्री. संगमा यांनी सांगितले की, भाजपाने स्वता:हुन पवारांना पाठिंबा दिला तर आम्ही तो घेऊ. भाजप सहा वर्षे सत्तेत होता आणि त्यांच्या बाजुने लोकांनी कौल दिला होता. त्यामुळे भाजपा अस्पृश्य कसा नाही. ज्या लोकांनी भाजपाला मतदान केले ते जातीयवादी कसे ठरू शकतात? असा प्रश्न संगमा यांनी उपस्थित केला.