नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव गावीत यांनी आपले निकटतम प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे शरद गावीत आणि भाजपचे सुहास नटावदकर यांचा पराभव करून 33 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. सलग आठव्यांदा लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.
माणिकराव गावीत यांच्या उमेदवारीस यावेळी कॉंग्रेसमधील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दर्शविला होता. आदीवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनीही त्यांच्या उमेदवारीस स्पष्ट विरोध केला होता. त्यामुळे नाराज होऊन विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी केल्याने यावेळची लढाई प्रतिष्ठेची ठरली होती.