भाजपवर विभाजनवादी राजकारण करत असल्याचा आरोप करून युपीएच्या सरकारने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली आहेत, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य होऊ देणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मुस्लिम धर्मियांचे नाव न घेता सांगितले.
विद्वेष आणि विभाजनवादी राजकारणाच्या माध्यमातून आम्ही देशाला पुढे नेले नाही. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही यापुढेही धर्मनिरपेक्षतेचाच पथ आचरू, असे सांगत त्यांनी भाजपर तुफान टीका केली.
दहशथवादाविरोधात कठोर कारवाईसाठी युपीएचे सरकार तयार आहे, पण ही लढाई संयुक्तपणे लढली गेली पाहिजे. आमचे सरकार दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत आहेच, पण हे करताना कोणत्याही विशिष्ट धर्माचे नागरिक लक्ष्य ठरायला नकोत, असे आम्हाला वाटते, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.