पक्ष संघटन मजबुतीसाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा राहुल गांधींचा उत्तर प्रदेश फॉर्म्युला अखेर यशस्वी ठरला असून पक्षाच्या विजयासाठी राहुलने घेतलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनतर कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. गेल्या दोन निवडणुकांपेक्षाही यावेळी कॉंग्रेसने अधिक जागा मिळविल्या आहेत.
राहुल गांधी यांच्या सोबत प्रियंका गांधी यांनीही या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली आहे.