Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभेसाठी निश्चित कालावधी असावा- अडवानी

लोकसभेसाठी निश्चित कालावधी असावा- अडवानी

भाषा

लोकसभा व विधानसभांसाठी निश्चित कालावधी असावा तसेच निवडणूक फेब्रुवारी महिन्यातच घेऊन मतदान सर्वांसाठी सक्तीचे करावे अशी सूचना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी केली आहे.

यासाठी आपण घटना दुरूस्ती करू शकतो काय यावर सर्वच राजकीय पक्षांनी आणि निवडणूक आयोगाने विचार करावा असे मतही त्यांनी मांडले. आपण या बाबतीत इंग्लंडचे अनुकरण केले आहे. पण ही व्यवस्था आपल्याला लागू होणारी नाही, असे ते म्हणाले.

अडवानी यांनी आज येथे पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विद्यमान सरकारने जरी बहुमत गमावले तरी लोकसभा बरखास्त न करता नव्या सरकारकडे त्याचा कार्यभार सोपवावा अशी सुचना त्यांनी केली.

उन्हाळ्यात मतदान कमी होत असल्याने ते फेब्रुवारीत घ्यावे अशी मागणी त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi