राज्यात लोकसभेच्या दुसर्या टप्प्यासाठी मतदान होत असून केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कुटुंबासह बारामतीत मतदान केले.
श्री. पवार यावेळी प्रथमच बारामती सोडून सोलापूर जिल्ह्यातील माढा या मतदरासंघातून लढत आहेत. त्यांची कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून लढत आहेत.
श्री. पवार नसले तरीही आपल्याला मोठे बहूमत येथे मिळेल, असा विश्वास सुप्रिया यांनी यावेळी व्यक्त केला.