बिहारचा विकास केल्यानेच मतदारांनी जनता दलाच्या बाजूने मते दिल्याचे सांगतानाच विकासाच्या सकारात्मक राजकारणामुळेच आपला विजय झाल्याचे मत जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी व्यक्त केले आहे.
नितिश यांच्या पक्षाला बिहारमध्ये 21 जागांवर विजय मिळाला असून, लालूंच्या आरजेडीला मतदारांनी चांगलाच झटका दिला आहे.
जेडीयू पाठोपाठ बिहारमध्ये 12 जागा भाजपला मिळाल्या आहेत. या विजयाचे सारे श्रेय नितिश यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि बिहारच्या मतदारांना दिले आहे.
बिहारमध्ये राज्य सरकारने केलेल्या विकासामुळे जनतेने लालूंना नाकारत जनतादलाच्या बाजूने कौल दिल्याचे ते म्हणाले.
कॉग्रेसने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास आपले समर्थन असल्याचे म्हटले असून, आता पक्षाने बिहारला त्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करतानाच अजून आपण कोणत्याही गटात नसल्याचे नितिश यांनी म्हटले आहे.