नाशिक मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या समीर भुजबळ यांच्या विरोधात बोगस मतदान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते चांगलेच संकटात सापडले आहेत. समीर हे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.
शिवसेनेचे महानगर अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी समीर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, शिवसेना उमेदवार दत्ता गायकवाड आणि भुजबळ यांच्यात मतदान केंद्रावर बाचाबाची झाल्यानंतर चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
यानंतर समीर यांनी शिवसेना नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.