Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रपतींशी तज्ज्ञांशी चर्चा

सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रपतींशी तज्ज्ञांशी चर्चा

वार्ता

केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये निवडणूक पूर्व तडजोडी सुरू झाल्या असतानाच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी घटना तज्ज्ञ आणि कायदे तज्ज्ञांशी विचारमंथन करण्यास सुरवात केली आहे.

श्रीमती पाटील यांनी श्रृंगेरी दौर्‍यादरम्यान अतिरिक्त महाधिवक्त गोपाल सुब्रमण्यम यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. यात भावी सरकारच्या स्थापनेसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. लोकसभेच्या चार टप्प्यांसाठी मतदान झाले असून त्यावरून तरी कुण्या एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहूमत मिळेल असे वाटत नाही. अशा वेळी राष्ट्रपती काय निर्णय घेतील यावरच सर्व काही अवलंबून आहे. त्यासाठी कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi