सुरक्षा कारणांमुळे कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चेन्नई आणि पुड्डुचेरी येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे.
श्रीलंकेत सुरू असलेल्या हिंसाचारात तमिळ जनतेचे हाल सुरू असल्याने सोनियांच्या या दौऱ्यात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा तमिळ जनतेने दिला होता. यानंतर सोनिया यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.