rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2 महिन्यांच्या नववधूने संपूर्ण कुटुंबासाठी केले पिंड दान कारण जाणून आश्चर्य होणार

Mahakumbh 2025
, मंगळवार, 21 जानेवारी 2025 (15:06 IST)
सध्या प्रयागराज येथे महाकुंभ 2025 सुरु आहे. या महाकुंभात भाविक सन्यांसीचे आशीर्वाद घेण्यासाठी दूरवरून येतात. या महाकुंभात अनेकांनी आपला संसार सोडून संन्यास घेण्याचा विचार केला आहे. या मध्ये संन्यास घेणारी एक आहे दिल्लीची ममता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या कौटुम्बिक जीवनाला सुरुवात करणारी ममता वशिष्ठ या महिलेने महाकुंभात स्वत:चे आणि संपूर्ण कुटुंबाचे पिंडदान करून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. आणि संन्यासी मार्ग स्वीकारून किन्नर आखाड्याची महामंडलेश्वरची जबाबदारी स्वीकारली.या साठी ममताची औपचारिक नियुक्ति करण्यात आली आहे. 
ALSO READ: PM मोदी जाणार महाकुंभ मध्ये,सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली
ममता या महिलेचे दोन महिन्यांपूर्वी दिल्लीतील संदीप वशिष्ठ यांच्याशी लग्न झाले. मात्र तिने कौटुंबिक संसाराचा त्याग करून संन्यासी मार्ग निवडला आहे. तिला सनातन धर्माचे प्रचार करायचे असून मानवाच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. असे ती म्हणाली.संन्यास घेण्यापूर्वी तिने महाकुंभात स्वत:चे आणि कुटुंबाचे पिंडदान केले. 
 
किन्नर आखाड्याच्या शिबिरात ममताने पिंडदानाचा विधी पूर्ण केला. यानंतर किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांना आखाड्याचे महामंडलेश्वर घोषित केले.ममता आता त्यागाचा मार्ग अवलंबून धर्म आणि मानवतेची सेवा करणार आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुग्णवाहिकेचा दरवाजा जाम झाला, रुग्णालयाबाहेर रुग्णाचा मृत्यू