पृथ्वीसारख्या दिसणार्या आणखी तीन नवीन ग्रहांचा शोध लावणयात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हे तिन्ही ग्रह आपल्या सौरमालिकेपासून 100 प्रकाशवर्ष दूर आहेत. त्यांना सध्या सुपर अर्थ असे नाव देण्यात आले आहे.
हे तिन्ही ग्रह ज्या तार्याभोवती फिरतात त्या तार्याला जीजे-9827 असे नाव देण्यात आले आहे. हे तीनही ग्रह त्याच्या तार्याच्या अगदी जवळच्या कक्षेतून भ्रमण करतात. त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अनुक्रमे 1.2, 3.6 आणि 6.2 दिवस लागतात. त्यांच्यावर अनुक्रमे 1172, 811 आणि 680 अंश केल्विन इतके तापमान आहे. अवकाशात आढळलेल्या या ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अधिक आणि नेपच्यूनपेक्षा कमी आहे.
अमेरिकेतील हार्वर्ड- स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रॉफिजिक्समधील संशोधकांनी हे ग्रह शोधले आहेत.