सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून टाकण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रेन असो किंवा मेट्रो असो. तरुण तरुणी रिल्स बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. एका ट्रेन मध्ये एक तरुणी नाचत आहे. आणि नाचता नाचता ती एका पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर नाचत आहे. नंतर तिला पाहून देखील पोलीस देखील ठेका धरत आहे.
याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेल्वे मध्ये असे व्हिडीओ बनवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस देखील कर्तव्य बजावताना रेल्वे मध्ये रिल्स बनवू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ फेक आणि स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं जात आहे.
पोलीसचा पोशाख घातलेली ही व्यक्ती खरी पोलीस आहे की फेक आहे. हे अद्याप समजू शकले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांचे मनोरंजन करत आहे. मात्र ट्रेन मध्ये असे व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. या मुलीवर देखील काही कारवाई करण्यात येईल असं व्हिडिओच्या सुरुवातीला वाटलं.