Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, जगाचा विनाश २१ जूनला होणार, मायन संस्कृतीचा दावा

काय म्हणता, जगाचा विनाश २१ जूनला होणार, मायन संस्कृतीचा दावा
, सोमवार, 15 जून 2020 (16:06 IST)
मायन संस्कृतीच्या कालगणनेनुसार पुढच्या आठवड्यामध्ये जगाचा अंतर होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. कारण  ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ने याबाबत एक बातमी केली आहे.
 
एका सिद्धांतानुसार मायन संस्कृतीची कालगणना वाचण्यामध्ये चूक झाली आहे. या चूकीमुळेच जग २०१२ ला संपेल असं सांगतिलं होतं. मात्र आता जगाचा अंत हा याच वर्षी जून महिन्यामध्ये होणार असल्याचा दावा केला जात आहे. नवीन दाव्यानुसार या मायन संस्कृतीच्या ज्युलीयन कालगणनेनुसार आपण सध्या २०२० मध्ये नसून २०१२ मध्ये आहोत असं सांगितलं जात आहे. लंडनमध्ये राहणारे वैज्ञानिक पाओलो टाबेलोगेन यांनी एक ट्विट केलं होतं असं ‘द न्यू यॉर्क पोस्ट’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, “ज्युलीयन कालगणेचानुसार तांत्रिक दृष्ट्या आपण २०१२ मध्ये आहोत. जॉर्जियन कालगणना आणि ज्युलीयन कालगणनेमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो. त्यामुळे १७५२ पासून २०२० चा विचार केल्यास २६८ वर्षे होतात. प्रत्येक वर्षाचे ११ दिवस याप्रमाणे ११ गुणे २६८ म्हणजे २९४८ दिवस होतात. २९४८ ला ३६५ ने भाग दिल्यास ८ असे उत्तर मिळते. म्हणजेच आठ वर्षे,” असं म्हटलं होतं.
 
त्यामुळे हा सिद्धांत खरा आहे असं समजल्यास २०१२ हे वर्ष विनाशाचे असेल असं गणित चुकीचं असल्याचं सांगितलं जात आहे. नवीन दाव्यानुसार जगाचा विनाश हा २१ डिसेंबर २०१२ झाला नाही म्हणजेच तो २१ जून २०२० ला होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचे २ अधिकारी बेपत्ता