Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

Another song by Amrita Fadnavis on the occasion of Diwali; Sonu Nigam will also sing along दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; Marathi News Lokpriya Marathi  News In  Marathi   Webdunia Marathi
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)
येत्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस  यांचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. स्वतः फडणवीस यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती असून त्यांच्यासोबत गायक सोनू निगम  ही गाणार आहे. ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, श्रोत्यांसाठी लवकरच महालक्ष्मीची आरती येत आहे.

तसेच त्यांनी आरतीचं पोस्टर रिलीज केलं असून सोबत आरतीतील काही ओळी देखील त्यांनी टाकल्या आहेत.या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसत असून ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे. अमृता फडणवीस  यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स ही मोठा आहे. महिला दिनीही त्यांचे एका गाणं  प्रदर्शित झालं होत. केवळ गाणेच नाही तर त्या  वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील परखडपणे भाष्य करतात. बऱ्याचदा अमृता फडणवीस यांना ट्रोल देखील करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातल्या शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी