Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Automatic Car Accident Viral Video :कार दुरुस्त करताना अपघात व्हिडीओ व्हायरल !

Automatic Car Accident Viral Video :कार दुरुस्त करताना अपघात व्हिडीओ व्हायरल !
, बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (19:09 IST)
अपघात कधीही आणि कुठेही होऊ शकतो, त्यामुळे एखाद्याने नेहमी सतर्क राहावे. असे म्हटले जाते की काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, हा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अंदाज लावता येतो, ज्यामध्ये बोनेट उघडून कार दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीसोबत असे काही घडते, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कार दुरुस्त करताना दिसत आहे. दीपक प्रभू यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ऑटोमॅटिक वाहनं नादुरुस्त असल्यास कधीच त्याच्या समोर उभे राहू नका, असं आवाहन प्रभू यांनी केलं आहे. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सतर्क करा, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी कार ऑटोमॅटिक असल्यानं ती आपोआप पुढे गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
व्हिडीओमध्ये कार शेडच्या खाली उभी असलेली दिसते. तिथे एक महिला लहान मुलाला कुशीत घेऊन खेळवत आहे. आणखी दोन जण तिथे आहेत. त्यातील एक जण कारची दुरुस्ती करत आहे. कारचं बोनेट उघडून तो पाहणी करतो. पाहणी करत असताना अचानक कार सुरू होते आणि ती बोनेटसमोरील व्यक्तीच्या अंगावर जाते.
 
बोनेटसमोर असणारी व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड करते. मात्र कार थेट त्याच्या अंगावर जाते. कार बोनेटला धडकते आणि व्यक्ती कार आणि बोनेटच्या मध्ये अडकते. त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात येतं. ती व्यक्ती जिवंत आहे की या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला हे समजू शकलेलं नाही. मात्र लोकांचा आक्रोश स्पष्टपणे ऐकू येत आहे.
 
आतापर्यंत हा व्हिडीओ2लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार न्यूट्रलवर नव्हती. त्याच्या असं केल्याने जीवावर बेतली असल्याचं लोकांचं म्हणणे आहे. 
 
हा व्हिडिओ कुठे आणि कधी व्हायरल होत आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही, मात्र हा व्हिडिओ खरोखरच भयावह आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ragiing_bull नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एखादे ऑटोमॅटिक वाहन बिघडले तर कधीही वाहनासमोर उभे राहू नका. कृपया आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना चेतावणी द्या. उदाहरण म्हणून हा संदेश शेअर करा.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gulabbai Sangamnerkar Passes Away : लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन