Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबा रामदेव यांनी पतंजलीसाठी सिम कार्ड केले लाँच

बाबा रामदेव यांनी पतंजलीसाठी सिम कार्ड केले लाँच

योगगुरु बाबा रामदेव यांनी आता टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश करत एक सिम कार्ड लाँच केले आहे. त्याला 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' नाव देण्यात आले आहे. भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे कार्ड लाँच केले आहे. सध्या हे कार्ड फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल. यामध्ये 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर यूजरला 2GB डेडा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. त्यासोबतच या सिमद्वारे पतंजलीची उत्पादने मागवल्यास 10% डिस्काऊंट मिळणार आहे.

 

या सिममध्ये फक्त 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच 2GB डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे. सध्या  हे सिम  फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी लाँच केले आहे, मात्र जेव्हा हे सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाईल तेव्हा या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर 10% सूट दिली जाणार आहे. सोबतच सिमच्या यूजरला 2.5 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि 5 लाख रुपयापर्यंतचे लाइफ लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्यात निपाह विषाणूचा संशयित रुग्ण सापडला