Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Zomato डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या नाकावर बुक्का मारला

Zomato डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या नाकावर बुक्का मारला
, गुरूवार, 11 मार्च 2021 (14:47 IST)
ही धक्कादायक घटना बंगळुरु येथील आहे. जेथे एका महिलेने फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो वरुन जेवण ऑर्डर केले होते. परंतू ऑर्डर लेट झाल्यामुळे रद्द करण्यात आला तरी डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पोहचला. अशात तिने ऑर्डर घेण्यास नकार दिला या गोष्टीवरुन रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर बुक्का मारला ज्यामुळे महिला रक्तबंबाळ झाली. त्यांनी इंस्टाग्रामवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
 
या महिलेने रक्तबंबाळ अवस्थेतील स्वत:चा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर पीडित महिलेनं बंगळुरुतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण
हितेशा चंद्राणी पीडित महिलेचे नाव असून त्या कंटेट क्रिएटर आहेत. त्यांनी व्हिडीओत सांगितले की दुपारी 3.30 च्या सुमारास झोमॅटो कंपनीकडे ऑर्डर बुक केली. सुमारे एक तास उलटल्यानंतरही कंपनीने ती ऑर्डर स्विकारली नसल्यामुळे त्या याबाबत कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस विभागाशी फोनवर बोलत होत्या. आपली ऑर्डर रद्द करुन सर्व पैसे परत देण्याची मागणी फोनवर करत असताना डिलिव्हरी बॉय घरी आला. त्यांनी ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याला रागा आला आणि दाराला धक्का देत आत येऊन त्याने टेबलावर ऑर्डर ठेवून दिला. महिलेने याचा विरोध केल्यावर त्याने रागात मी कोणाचा नोकर नाही असं म्हटतं त्यांच्या नाकावर बुक्का मारला. हितेशाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नाकातून रक्क वाहताना दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HITESHA | Beauty Influencer (@hiteshachandranee)

झोमॅटोने मागितली माफी
या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर झोमॅटो कंपनीने संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरुन हटवल्याची माहिती दिली. तसंच कंपनीने महिलेशी संपर्क करुन त्यांना सहकार्याचे आश्वासन देखील दिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय बनावटीची पहिली कार बीएमडब्ल्यूने लाँच केली