लवामा येथे भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संताप दिसून येत आहे. गूगलवर देखील पाकिस्तानच्या सन्मानाची चिरफाड होत आहे. गूगलवर Best Toilet paper in the World (जगातील बेस्ट टॉयलेट पेपर) सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दाखवला जात आहे. ह्या सर्चचा स्क्रीन शॉट अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर देखील besttoiletpaperintheworld ट्रेंड करत राहिले.
गूगलवर टॉयलेट पेपर सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसून येईल. या व्यतिरिक्त केवळ टॉयलेट पेपर किंवा चायना मेड टॉयलेट पेपर लिहिल्यावर देखील पाक झेंडा दिसेल. तसेच गूगलने कोणतीही छेडछाड केल्याचे नाकारले आहे.
गुगलची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी भिकारी सर्च केल्यावर इमरान खान यांचा फोटो दिसत होता. तसेच इ़डियट सर्च केल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि फोटो झळकावला जात होता. गूगलने अशा प्रकाराच्या चूकीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. गूगलचे अल्गोरिथम अनेकदा वेगवेगळे परिणाम दर्शवत असतो.