Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरटेलची धमाकेदार ऑफर, अवघ्या ९७ रुपयात कॉम्बो प्लॅन

एअरटेलची धमाकेदार ऑफर, अवघ्या ९७ रुपयात कॉम्बो प्लॅन
एअरटेलने धमाकेदार ऑफर आणली आहे. यात  कमी रुपयांमध्ये जास्त इंटरनेट डेटा दिला आहे. ९७ रुपयांच्या कॉम्बो प्लॅनमध्ये कंपनीकडून १.५ जीबी इंटरनेट डेटा आणि ३५० मिनिटे कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग अशा दोन्हींचा समावेश आहे. तर २०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. हा ९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात उपलब्ध आहे. कंपनीच्या आधीच्या ९९ रुपयांच्या प्लॅनला हा प्लॅन पर्याय असेल. यामध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि १०० मेसेज मोफत मिळत होते. एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच My Airtelअॅपवर या रिचार्जचा फायदा घेता येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी