Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपीए 3 यशस्वी होणार नाही : माकप

यूपीए 3 यशस्वी होणार नाही : माकप
नवी दिल्ली , शुक्रवार, 23 मार्च 2018 (10:56 IST)
भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे देण्यावर सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये एकमत नसून काही पक्षांना त्यावर आक्षेप आहे. काँग्रेसने पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचा प्रयोग केल्यास यशस्वी होणार नाही. काँग्रेसने आपली विश्वासार्हता गमावली आहे. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये भाजपविरोधी मतांची एकजूट झाली पाहिजे असे सीपीआय(ए)चे नियतकालिक 'पीपल्स डोमेक्रसी'च्या लेखात म्हटले आहे.
 
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस किंवा अन्य कुठल्याही प्रादेशिक पक्षाबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करण्याची शक्यता सीपीआय(ए)ने फेटाळून लावली आहे तसा राजकीय ठरावच त्यांनी केला आहे. बीजेडी, टीआरएस आणि टीडीपी हे पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करणार नाहीत असे सीपीआय(ए) ने म्हटले आहे.
 
मागच्याच आठवड्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात डिनरच्या नित्तिाने 20 पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यात सीपीआय(ए) चे सुद्धा नेते होते.
 
उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र आले. त्याचा त्यांना फायदा झाला. सध्याच्या घडीला भाजपला रोखण्यासाठी अशा रणनीतीची गरज आहे. भाजपचा पराभव कसा करता येऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटल्या तर लोकसभेत ते बहुत मिळवू शकणार नाहीत, असे या लेखात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभेच्या 58 जागांसाठी आज मतदान