आकाशातून पाऊस पडण्याचे, गारे पडण्याचे आपण ऐकले आहे.रस्त्यावर पडणाऱ्या मासे गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
बिहारच्या गया जिल्ह्यातील अमास पोलीस स्टेशन परिसरात रस्त्यावर पडलेले मासे लुटण्याची शर्यत सुरू होती, त्यामुळे काही काळ जाणाऱ्या वाहनांचा वेगही थांबला होता. आता रस्त्यावरील मासे लुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, हे प्रकरण अमास पोलीस ठाण्याच्या अकौना येथील आहे, जिथे जाणाऱ्या ट्रकमधून मासे पडू लागले, त्यानंतर रस्त्यावर पडलेले मासे लुटण्यासाठी लोक तुटून पडले. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गया जिल्ह्यातील अकौना गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 2 वर पश्चिम दिशेकडून माशांनी भरलेल्या ट्रकचा अचानक तोल गेला. आणि ट्रक पालटला. आणि ट्रक मध्ये पाण्याच्या टबमध्ये ठेवलेले मासे रस्त्यावर पडू लागले.ते बघून नागरिकांमध्ये माशांचा पाऊस पडल्याची चर्चा सुरु झाली आणि ते गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
रस्त्यावर मासे पडताना पाहून आजूबाजूच्या गावात एकच गोंधळ उडाला आणि रस्त्यावर पडलेले मासे लुटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.अधिकाधिक मासे गोळा करण्यासाठी काही बादली आणि काही गोणी घेऊन तिथे पोहोचले. कोणाकडे सॅक होती, तर कोणी फक्त वाटी आणि थाळी घेऊन तिथे पोहोचले. त्याच्या घरी जमेल तेवढे नेले. यादरम्यान कोणीतरी मासे लुटण्याच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.