Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

फिरत्या मंडपात वऱ्हाड्यांचा डान्स

dance
औरंगाबाद , गुरूवार, 21 एप्रिल 2022 (16:11 IST)
भरदुपारच्या उन्हात अंग भाजून निघत होते... थोड्या थोड्या वेळाने लोक पाणी, लिंबू सरबत, ताक पीत होते... अशा उन्हात घरातून बाहेर पडण्याच्या विचाराने अनेकांना घाम फुटत होता पण येथे क्रांती चौकात एक वरात चालली होती. वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरीकडक उन्हाळा.. त्यात लग्नतिथी व मुहूर्त भरदुपारचा.  वऱ्हाडी मनसोक्त झिंगाट नृत्य करीत होते. कारण, त्यांना ऊन लागत नव्हते. खास वऱ्हाडींसाठी चालता, फिरता कापडी मंडप आणण्यात आला होता.वरात काढायची तेही उन्हाची पर्वा न करता.. मग शक्कल लढविण्यात आली. 
 
 इंदूरहून खास फिरता मंडप शहरात आणण्यात आला. मंडपाला खालून चारी बाजूने चाक व तो मंडप ओढण्यासाठी मजुरांची व्यवस्था अशा कापडी मंडपाच्या सावलीत बँड पथकातील कलाकार वऱ्हाडी चालत होते. मधील मंडपामध्ये काही वऱ्हाडी नृत्य करीत होते. मंडपाच्या सावलीने त्यांना उन्हाचा त्रास झाला नाही. पहिल्यांदाच शहरात असा वरातीचा चालता मंडप पाहून रस्त्याने जाणारे वाहनधारक थोडा वेळ थांबून ही वरात पाहत होते. प्रत्येक लग्नसोहळ्यात कल्पकता व नावीन्य हवे असते. ज्यास हे समजले, तो व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहतो. या फिरत्या मंडपाद्वारे हे सिद्ध झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या