मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’ या पांढर्या वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. संधिवात आणि स्नायूदुखीने आजारी असलेल्या या वाघाला १० दिवसांपासून चालणेही शक्य होत नव्हते. २००१ मध्ये हा रेणुका व सिद्धार्थ या जोडीपासून जन्माला आला होता.
या वाघाला गेली चार वर्षापासून संधिवात व स्नायुदुखी या व्याधींनी जखडले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय बाबींसाठी मार्गदर्शन करणारी तांत्रिक सल्लागार समिती असून या समितीत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्य तज्ज्ञ तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे निवृत्त पशुवैद्यक तज्ज्ञांनी या वाघाची पाहणी व परीक्षण केले. त्यानुसार या वाघावर औषोधोपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान या वाघाचा मृत्यू झाला.