पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनाच भेटायची इच्छा असते. पण सामान्य लोकांचे पंतप्रधानांपर्यंत पोहोचणे फारच अवघड आहे. पण आता त्यांच्याशी भेटणे फारच सोपे झाले आहे. सामान्य नागरिक आता फक्त पाच रुपये खर्च करून पीएम मोदी यांची भेट घेऊ शकतात.
नरेंद्र मोदी (नमो) ऐपच्या माध्यमाने पीएमशी भेटू शकता. यासाठी लोकांना नमो एपवर जाऊन बीजेपीला डोनेशन द्यावे लागणार आहे. कोणीपण 5 रुपये ते 1000 रुपयांपर्यंतचे डोनेशन या ऐपच्या माध्यमाने बीजेपीला देऊ शकता. पण हे डोनेशनला केल्यानंतर एक अट ठेवण्यात आली आहे.
अशी आहे अट
पार्टी फंडमध्ये डोनेशन दिल्यानंतर यूजरला एक रेफरल कोड मिळेल. या रेफरल कोडला 100 लोकांसोबत शेअर करावा लागेल. जर तो 100 लोक किंवा रेफरल कोडच्या मदतीने डोनेशन करतात तर तुमची भेट पीएम मोदींशी होऊ शकते. तसेच जर यूजर द्वारे पाठवण्यात आलेल्या या कोडचा वापर किमान 10 लोकांनी जरी केला तरी यूजरला नमो टीशर्ट आणि कॉफी मग फ्रीमध्ये मिळू शकेल.
तसेच या नवीन फीचरबद्दल पक्षाचे म्हणणे आहे की पीएम मोदींशी फारच कमी लोक भेटू शकतात. अशात या नवीन प्रयोगाच्या माध्यमाने लोकांमध्ये पीएम मोदी यांचा संवाद वाढू शकतो. ज्याने जास्तीत जास्त लोक पीएम पर्यंत पोहचू शकतात.
असे करा इंस्टॉल
जर तुम्हाला ही पीएम मोदींना भेटायचे असेल आणि या ऐपला इंस्टॉल करायचे असेल तर सर्वात आधी गूगल प्ले स्टोर किंवा आयओएस प्ले स्टोरमध्ये जा. तेथे नमो एप किंवा नरेंद्र मोदी एप सर्च करा. त्यानंतर याला इंस्टॉल करा. नंतर त्यात तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. तिथेच तुमचा लॉगिन आईडी आणि पासवर्ड असेल, ज्याने तुम्ही या एपाचा वापर करू शकाल.