Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता ड्रायविंग लायसेंस आणि RC ठेवणे आवश्यक नाही

आता ड्रायविंग लायसेंस आणि  RC ठेवणे आवश्यक नाही
आपण मोबाईल फ्रेंडली आहात तर आपल्याला वाहनांचे कागद आणि ड्रायविंग लायसेंस व इतर डॉक्युमेंट्स डिजी लॉकरमध्ये अपलोड केलेले असतील तर पोलिस आपलं चलन कापू शकत नाही. होय पण नियमांचे उल्लंघन केले असल्यास आपल्याला दंड भोगावा लागेल.
 
वाहतूक पोलिसांना डिजी लॉकरमध्ये वाहन संबंधी कागद तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आयटीडीए तज्ज्ञांने वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना सांगितले की नियमानुसार हे वैध आहे.
 
माहितीप्रमाणे डिजी लॉकर भारत सरकाराकडून सुरू करण्यात आलेली सेवा आहे. यात शासकीय आणि गैर शासकीय दोन्ही प्रकाराचे वाहनांचे कागदपत्रे ठेवता येऊ शकतात. मूळ प्रती मागितल्यास हे रेकॉर्ड दाखवता येऊ शकतात.
 
डिजी लॉकरमध्ये अपलोड रेकॉर्ड्स आयटी अॅक्टच्या नियम संख्या 9-ई अंतर्गत मूळ प्रती मानले जातील. सध्या डिजी लॉकरच्या व्यवस्थेवर मंथन सुरू आहे. हे लवकरात लवकर लागू करण्याची योजना आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रावसाहेब दानवे यांच्या मते भाजपला पुन्हा बहुमत मिळेल