कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे सर्व हैराण आहे. दरम्यान सोशल मीडियावर आयुष काढा याबद्दल खूप चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल एका पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की आयुष काढा प्यायल्याने रुग्ण तीन दिवसात बरे होतात. लोकं या पोस्टवर विश्वास करत आहे कारण भारत सरकारच्या आयुष मंत्रालयद्वारे देखील आयुष काढ़ा पिण्याचा सल्ला दिला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्ट-
सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये सांगितले गेले आहे की 30 ग्रॅम तुळशी पावडर, 20 ग्रॅम काळी मिरी, 30 ग्रॅम सूंठ, 20 ग्रॅम दालचीनी वाटून त्याला पाण्यात टाकून काढा तयार करा. पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की आयुष मंत्रालयद्वारे सांगण्यात आलेल्या या विशेष दिव्य काढा कोरोनाच्या 6000 रुग्णांवर वापरला गेला होता आणि त्यापैकी 5989 रुग्ण मात्र 3 दिवसात निगेटिव्ह झाले.
काय आहे सत्य
भारत सरकाराची प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) ने ट्विट करुन या दिशाभूल करणार्या बातम्यांविषयी लोकांना जागरूक केले आहे. PIB फॅक्ट चेकच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की- “सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की आयुष काढ़ा प्यायल्याने कोरोना संक्रमित व्यक्ती तीन दिवसात बरा होऊ शकतो. हा दावा दिशाभूल करणारा आहे. केवळ रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आयुष मंत्रालय द्वारे आयुष काढ़ा पिण्याची शिफारस केली जाते.