Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्टोपसची सटकली, पाण्यात उतरलेल्या व्यक्तीला काढलं झोडपून

ऑक्टोपसची सटकली, पाण्यात उतरलेल्या व्यक्तीला काढलं झोडपून
, शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (17:19 IST)
समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका शास्त्रज्ञाला ऑक्टोपसच्या रागाचा सामना करावा लागला. या ऑक्टोपसने भू-वैज्ञानिकाला फटके लगावले. आजवर पाहिलेला सर्वांत 'रागीट ऑक्टोपस' असं या संशोधकाने ऑक्टोपसचं वर्णन केलंय.
 
तुम्हाला ही बातमी वाचून हसू येईल. पण, ही घटना घडलीये ऑस्ट्रेलियामध्ये. भू-वैज्ञानिक लान्स कार्लसन यांच्यावर एका ऑक्टोपसने जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडियावर हा ऑक्टोपस चांगलाच चर्चेत आहे.
 
लान्स यांच्या सांगण्यानुसार, "ते पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. ते उथळ पाण्यातच असतानाच, ऑक्टोपसने त्यांच्यावर हल्ला केला."
 
ते पुढे म्हणतात, "ऑक्टोपसने पहिल्यांदा त्यांची मान आणि खांद्यावर हल्ला केला. ऑक्टोपसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लान्स यांचा पाठलाग केला आणि पुन्हा त्यांच्या हातावर हल्ला चढवला."
 
जखमेवर कोल्डड्रींक टाकावं लागलं
लान्स सांगतात की, ऑक्टोपसच्या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या. फार जळजळ होत होती. त्यावेळी त्यांनी जखमेवर कोल्डड्रींक टाकलं.
 
लान्स भू-वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी लाईफ गार्ड म्हणूनही काम केलंय.
 
ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक न्यूज चॅनलशी बोलताना लान्स म्हणतात, "समुद्रातील प्राण्यांकडून झालेल्या जखमेवर औषध लावणं गरजेचं आहे. पण, माझ्याकडे औषध नसल्याने मी त्यावर कोल्डड्रींक टाकलं."
 
ऑक्टोपसच्या हल्ल्याने वैज्ञानिक आश्यर्यचकित
या घटनेबाबत मीडियाशी बोलताना लान्स सांगतात, "समुद्रात पोहोण्यासाठी जाऊ असा विचार करून मी पाण्यात उतरलो. त्यावेळी एक गोष्ट मला माशांचा पाठलाग करताना दिसली."
 
"मला असं वाटलं की ती स्टिंग-रे आहे. जो सीगल वर हल्ला करतोय. पण, माझ्या जवळ आल्यानंतर मला कळलं की हा ऑक्टोपस आहे. त्यावेळी माझ्या हातात माझी दोन वर्षांची मुलगी होती. त्या ऑक्टोपसने माझ्यावर अचानक हल्ला केला," असं लान्स पुढे सांगतात.
 
यानंतर लान्स पाण्यात परत एकटे उतरल्यानंतरही या ऑक्टोपसने त्यांना पुन्हा शोधून हल्ला केला.
 
न्यूज एजन्सी रॉयटर्सशी बोलताना लान्स म्हणाले, "ऑक्टोपस माझ्या दिशेने फार वेगाने येत होता."
 
"ऑक्टोपसच्या अचानक हल्ल्याने पाणी गढूळ झालं, गॉगलमधून मला काही दिसत नव्हतं... मी धक्क्यात होतो आणि गोंधळलो होतो," असं लान्स पुढे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : बेडसाठी आंदोलन करणाऱ्या कोव्हिड रुग्णाचा मृत्यू