rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीर मुद्दा सोडवणार्‍याला नोबेल द्या : इम्रान

Nobel
नवी दिल्ली , मंगळवार, 5 मार्च 2019 (16:04 IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, या मागणीने पाकिस्तानात जोर धरला असतानाच, मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा, असा राग खुद्द इम्रान खान यांनीच आळवला आहे.
 
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर इम्रान खान यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली आहे. त्यावर इम्रान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट केले आहे. नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणार्‍या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येथे आहे 1100 वर्ष जुनं सासू सुनेचं मंदिर