Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

UIDAI क्रमांकाचे रहस्य समजले, गुगलनेच चुकीने क्रमांक टाकला

UIDAI क्रमांकाचे रहस्य समजले, गुगलनेच चुकीने क्रमांक टाकला
, शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (12:19 IST)
UIDAI क्रमांक मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही. शुक्रवारपासून सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत आहेत. त्यात अनेक जण हा व्हायरस आहे किंवा हे हॅकर चे काम असल्याचे सांगत आहेत. मात्र यात घाबरण्यासारखे अजिबात काही नसून ही केवळ तांत्रिक चूक आहे. 2014 मध्ये काढलेल्या काही गुगल अँड्रॉइड ओएस मध्ये गुगलनेच चुकीने हा क्रमांक घालून दिला होता अन नंतर तो तसाच वितरित झाला. आपली अँड्रॉइड ओएस गुगल कंपनी बनवते, आपल्या रेडमी,सॅमसंग इ. मोबाईल मध्ये येण्यापूर्वी गुगल ह्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना अँड्रॉइड ओएस पुरवते आणि नंतर ह्या कंपन्या आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून मोबाईल मध्ये अँड्रॉइड ओएस इन्स्टॉल करून तो मोबाईल विकतात असे स्पष्टीकरण  स्वतः गुगनेच स्पष्ट केले. त्यामुळे ह्या सगळ्या वादावर पडदा पडला आहे.
 
यात गुगल ने 2014 साली भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना "नजरचुकीने" UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. अन तीच ओएस मोबाईल निर्मात्यांनी इन्स्टॉल केली त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या संपर्क यादीत (Contact List) मध्ये सेव्ह झालेला दिसतो. ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतर च्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान