Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुंड्यात बाईक न मिळाल्याने नवरदेव लग्नमंडपातून फरार

Wedding Snake
, रविवार, 12 जून 2022 (13:15 IST)
हुंड्यात बाईक न मिळाल्याने वराने लग्नातून पळून गेल्याची विचित्र घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात समोर आली आहे. लग्नात हुंडा मागणे आज देखील सुरु आहे. आज ही लग्नात हुंडा न दिल्यामुळे रुसवे-फुगवे होण्याच्या घटना घडतात. हुंड्यात बाईक न मिळाल्याने वराने लग्नातून पळून गेल्याची विचित्र घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात समोर आली आहे.ही  घटना कानपूरच्या शरीफापूर गावातील आहे. येथे सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये 144 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उत्तर प्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी आलेल्या एका नवरदेवाने पाणी पिण्यासाठी जात असल्याचे बहाणे सांगत लग्नाच्या मंडपातून लग्न न करता पळ काढला आहे.  

तो परत न आल्याने त्याचा बराच शोध घेण्यात आला, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. नंतर मुलीच्या आईने अधिकाऱ्यांना सांगितले की, वराने हुंडा म्हणून दुचाकीची मागणी केली होती.हुंड्यात दुचाकी मागितल्याचा आरोप करत मुलीच्या आईने आमदार तिरवा कैलाश राजपूत यांना तक्रार पत्र दिले आहे. 
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा वधूने सांगितले की आर्थिक अडचणींमुळे त्याची मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा वराने बाहेर जाण्याची योजना आखली आणि तेथून पळ काढला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली' - अमित शाह