Publish Date: Mon, 25 Jun 2018 (10:28 IST)
Updated Date: Mon, 25 Jun 2018 (10:31 IST)
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन हॉकी ट्रॉफीमध्ये भारताने विजयी अभियान सुरू ठेवले असून, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने अर्जेंटिनाचा २-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंह आणि मनदीप सिंहने प्रत्येकी एक गोल केला आहे, सोबतच अर्जेंटिनाकडून गोंजालो पिलाटने एकमेव गोल केला. भारताचा कर्णधार सरदार सिंहला ३००व्या सामन्यात विजयाचे गिफ्ट दिले.