Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील बाईंची चंद्रावर एक एकर जमीन वाचा काय आहे प्रकरण

पुण्यातील बाईंची चंद्रावर एक एकर जमीन वाचा काय आहे प्रकरण
, सोमवार, 14 जानेवारी 2019 (09:06 IST)
नवीन काही घडले की पुणे आठवते आता असाच प्रकार पुन्हा घडला आहे. त-हेवाईक वागणे, बोलणे आणि कृती यामुळे जगाच्या पाठीवर आपली विशेष छाप उमटविलेले पुणेकर कायमच चर्चेत राहतात. पुण्यात राहणा-या राधिका दाते - वाईकर त्यापैकी एक त्यांनी तब्बल 13 वर्षांपूर्वी चंद्रावर एक एकर जागा खरेदी केली. त्यासाठी एका संस्थेकडे पैसे देखील भरले. मात्र प्रत्यक्षात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या खुप उशिरा म्हणजेच आता लक्षात आले आहे. पंजाब येथील एका व्यक्तीने लुनार फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी एका न्युज वाहिनीवर पाहिली. त्यावेळी त्या बातमीनंतर चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा. जाहिरात करण्यात आली होती. हे वाचुन राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. आणि 6 नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांनी चंद्रावर जागा 50 हजार रुपयांना खरेदी केली. एक एकर जागा खरेदी केली होती. चंद्रावर मानवी वस्तीस पोषक असे वातावरण असल्याचे त्या कंपनीने सांगितले होते.  त्यानंतर 9 वेगवेगळी कागदपत्रे प्राप्त या बाईना मिळाली होती. मालकीपत्र, मिनरल राईट सर्टिफिकेट, लुणारची नियमावली, बिल आणि अधिकार, लुणारचा नकाशा आणि सर्व लुणारच्या जागेचे वर्णन त्यात करण्यात आले होते.आता तक्रार काय आणि कोठे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांना सांगितल्यानंतर त्यांनी हे प्रकरण खुप वर्ष  जुने असून, नेमका कुठला कायदा त्याजागी लागु होतो याबाबत पाहावे लागणार आहे. सहा महिन्यापासून मला पैसे मिळावेत यासाठी अर्ज करीत आहे. मात्र नमूद केलेल्या क्रमांकावरुन त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही असे बाईनी सांगितले आहे. असो आता चंद्र बगून मन भागवावे लागणर आहे.. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असे वापर कर EVM मशीन सोबत VVPAT या मशीन