Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रख्यात गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

प्रख्यात गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
, गुरूवार, 25 मार्च 2021 (20:26 IST)
महान गायिका आशा भोसले यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांना 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. गुरुवारी पुरस्कार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
आशा भोसले यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक अभिनेते आणि शास्त्रीय गायक होते. आशा भोसले यांचा जन्म सांगली येथे 1933 रोजी झाला. वयाच्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांचे गणपतराव भोसले यांच्याशी लग्न झाले. त्यावेळी गणपतराव 31 वर्षांचे होते. आशा भोसले यांनी तब्बल 16 हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहे..  
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या वतीने ट्वीट करुन ही माहिती देण्यात आली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना सन 2020 साठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आशा भोसले यांचे अभिनंदन केले.
वडिलांचे निधन झाले तेव्हा आशाताई अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. वडिलांचा अकाली निधन झाल्यावर त्यांचे कुटुंब पुण्याहून कोल्हापुरात आले, त्यानंतर कोल्हापूरनंतर संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि आशा यांनी कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी चित्रपटात गाणे गाणे सुरू केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रायविंग लायसन्सला आधार कार्डाशी लिंक कसे कराल