Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगल प्रभात लोढा सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर

मंगल प्रभात लोढा सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर
, मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (18:01 IST)
भाजपचे आमदार आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर ठरले आहेत. ग्रोहे हुरुन इंडिया (Groh Hurun India Real Estate Rich List for 2019) या यादीत सलग दुसऱ्या वर्षी लोढा हे प्रथमस्थानी राहिले आहेत. यावर्षी त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१ हजार ९६० कोटी रुपये एवढी असल्याचे सांगितले जात आहे. तर २०१८ साली त्यांच्याकडे २७ हजार १५० कोटींची संपत्ती होती. 
 
तब्बल ११ हजार ९०७ कोटींच्या मालमत्तेची विक्री करत लोढा ग्रुप देशातील सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे. लोढा हे मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे अध्यक्ष आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंत त्यांचे ४० बांधकाम प्रकल्प सुरु होते. बांधकामामध्ये तीन कोटींच्या वर स्क्वेअर फुट क्षेत्राचा समावेश होता. तर यापैकी २ कोटी ८६ लाख स्क्वेअर फुट क्षेत्रफळ हे फक्त मुंबई महानगर क्षेत्रातले होते.
 
लोढा यांच्यानंतर दिल्लीतील डीएलएफ ग्रुपचे राजीव सिंह आहेत. त्यांच्याकडे २५ हजार ८० कोटींची संपत्ती आहे. त बेंगलुरूचे जितेंद्र विरानी हे २४ हजार ७५० कोटींच्या उलाढालीसहीत तिसऱ्या स्थानी आहेत. हिरानंदानी कम्युनिटीजचे निरंजन हिरानंदानी यांनी सहा वरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांची वार्षिक उलाढाल १७ हजार ३० कोटींची आहे. तर रहेजा ग्रुपचे चंद्रू रहेजा हे १५ हजार ४८० कोटींसहीत पाचव्या स्थानावर आहेत. तर ओबेरॉय रिअॅलीटीचे विकास ओबेरॉय हे १३ हजार ९१० कोटींसहीत सहाव्या क्रमांकावर आहेत.
 
यावर्षीच्या १०० जणांच्या यादीत भारतातील ८ महिला बांधकाम व्यावसायिकेंचा देखील समावेश आहे. तर मुबंईतून सर्वाधिक ३७ व्यावसायिकांचा या यादीत समावेश आहे. तर दिल्ली आणि बेंगलुरू मधून अनुक्रमे १९ लोक आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीचा मृत्यू