Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरीने लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी ठेवल्या अजब अटी

नवरीने लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी ठेवल्या अजब अटी
, बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (00:30 IST)
स्वतःच्या लग्नाबाबत प्रत्येक जण स्वप्न रंगवत असतं. पण त्यासोबतच लग्नसारंभामध्ये सहभागी होणारी इतर मंडळीही स्वप्न पाहत असतात. त्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डिमांडही ऐकायला मिळतात. सध्या इंटरनेटवर एका नवरीची डिमांड लिस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये नवरीने तिच्यासाठी नाही तर तिच्याकडून येणार्‍या पाहुण्यांसाठी काही अटी ठेवल्या आहेत. तिची ही लिस्टइंटरनेटवर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका सोशल न्यूज आणि डिस्कशन फोर 'रेडिट'वर एका ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. Laikascat नावाच्या यूजरने हा स्क्रीनशॉर्ट पोस्ट केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना एका लग्नसारंभामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्याचसोबत लग्नाचे आयोजन करणार्‍या लोकांकडून एक डिमांड लिस्टही पाठवण्यात आली होती. या लिस्टमध्ये विचित्र डिमांड करण्यात आल्या होत्या. ई-मेलचा स्क्रीनशॉट पोस्ट करत Laikascat ने असे लिहिले की, 75 डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या गिफ्टशिवाय लग्नामध्ये तुम्हाला एन्ट्री मिळणार नाही. यासारख्या अनेक अटी लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी ठेवण्यात आल्या. 
 
या अटी खालीलप्राणे -
 
समारंभामध्ये 15 ते 30 मिनिटांआधी पोहचा. कृपया पांढर्‍या, क्रिम रंगाचे किंवा हत्तीच्या दातांपासून तयार करण्यात आलेल्या कोणत्याही वस्तू परिधान करू नका. 
कृपया बेसिक बॉब किंवा पोनी टेल या व्यतिरिक्त कोणतीही हेअर स्टाइल करू नका. कृपया पूर्ण चेहर्‍यावर मेकअप करू नका. 
समारंभ सुरू असताना रेकॉर्डिंग करू नका. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यं फेसबुकवर चेक-इन करू नका. 
नवरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करू नका. लग्नात येताना 5389 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे गिफ्ट घेऊन या. नाहीतर तुम्हाला लग्नामध्ये एन्ट्री नाही मिळणार. 
 
रेडिटवर नवरीच्या अटी फार व्हायरल होत आहेत. अनेक कमेंट आल्या आहेत. लोक नवरीची थट्टाही करत आहेत. आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे ई-मेलमध्ये अनेक चुका आहेत. एका यूजरने नवरीला ट्रोल करत असे लिहिले आहे की, असे वाटतये की, हा ई-मेल नवरीने स्वतः लिहिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले